Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Nashik › मुलीची हत्या करीत पित्याची आत्महत्या

मुलीची हत्या करीत पित्याची आत्महत्या

Published On: Mar 25 2018 1:38AM | Last Updated: Mar 25 2018 1:38AMडांगसौंदाणे : वार्ताहर

बागलाण तालुक्यातील पश्‍चिम भागातील ततानी शिवारातील पिंपळ्यामाळ पाड्यावरील आदिवासी शेतकरी आनंदा बापू चौरे (40) याने शुक्रवारी रात्री स्वतःच्या शेतातील घरात आपल्या चार वर्षाच्या मुलीला गळफास देत स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बागलाण तालुक्यातील ततानी शिवारातील केळझर धरणालगत असलेल्या पिंपळ्यामाळ पाड्यावरील आदिवासी शेतकरी आनंदा बापू चौरे याने शुक्रवारी मध्यरात्री चारवर्षीय मुलगी राणी हीस गळफास दिला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार स्थानिक शेतकरी व कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती सटाणा पोलिसांना देण्यात आली.

Tags : Nashik, Nashik News, fathers suicide, killing, his daughter