Sat, Nov 17, 2018 20:34होमपेज › Nashik › ‘हल्लाबोल’च्या निमित्ताने दिग्गजांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

‘हल्लाबोल’च्या निमित्ताने दिग्गजांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 12:41AMदेवळा : वार्ताहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त देवळा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, देवळा नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांसह अनेक दिग्गज कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल दौरा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरू झाला असून, त्याचे नाशिक जिल्ह्यात आगमन झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे रविवार (दि.18) देवळा तालुक्यात आगमन होणार असून, देवळा पाचकंदील येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देवळा नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील अनेक दिग्गज कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

सदरच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी सुरू असून, तालुकाभर दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात माजी आमदार शांताराम आहेर, मविप्रचे संचालक डॉ. विश्राम निकम, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, माजी सभापती उषा बच्छाव, वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव शिरसाठ, नूतन आहेर, उमराणा बाजार समितीचे सभापती राजू देवरे, खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर, खालपचे कैलास आहेर, कृष्णा अहिरे, सतीश सूर्यवंशी आदी प्रयत्नशील आहेत.