Fri, Apr 26, 2019 04:07होमपेज › Nashik › बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:51PMचांदवड : वार्ताहर

वागदर्डी येथे शेतातील पाण्याच्या ओहोळावर अंघोळ करीत असलेल्या शेतमजुरावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने शेतमजुराची मानेचा लचका तोडल्याने शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वागदर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हल्ला करणारा प्राणी नेमका बिबट्या आहे की तरस यांचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहे.

वागदर्डी येथील ज्ञानेश्‍वर कारभारी पगार या शेतकर्‍यांच्या शेतात सीताराम भिवसेन सोनवणे (70) हा शेतमजुरीचे कामकाज करतो. शनिवारी (दि.24) दुपारी नेहमीप्रमाणे सोनवणे यांनी शेतात काम केल्यावर ओहोळावर अंघोळ करीत असताना अचानक बिबट्यासारख्या प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सोनवणे यांची मान धरली. सोनवणे यांनी आरडाओरडा केला असता आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे धाव घेतली असता बिबट्याने घटनास्थळावरून डाळिंबाच्या बागेत पळ काढला. या घटनेत शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला.