Tue, Jan 22, 2019 10:04होमपेज › Nashik › न्यायालयच निर्णय घेईल : अ‍ॅड. निकम

न्यायालयच निर्णय घेईल : अ‍ॅड. निकम

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:49AMनाशिक : प्रतिनिधी

लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करण्यात अपयश आल्यामुळेच आज आरक्षणाची गरज निर्माण झाली असून, त्यामुळेच संघर्ष वाढीस लागला आहे. मात्र, आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयच देऊ शकेल, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये आलेल्या अ‍ॅड. निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. त्यामुळेच या माध्यमांचा वापर चांगल्या बाबींसाठी करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.