Wed, Jul 17, 2019 18:02



होमपेज › Nashik › दहावी निकालाच्या तारखेबाबत संभ्रम

दहावी निकालाच्या तारखेबाबत संभ्रम

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:50AM



नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.11) जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालाच्या तारखेबाबत अद्यापही संभ्रम कायम असल्याने विद्यार्थी अन् पालकांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर होत असल्याने या अफवांच्या पिकामुळे पालक आणि विद्यार्थी मात्र बेचैन होत आहेत. मंगळवारी (दि.5) सोशल मीडियाद्वारे पुन्हा 11 जून ही तारीख जाहीर झाली. सोशल मीडियातून 6 जून आणि 11 जून ही तारीख निकालासाठी जाहीर झाली. यासंदर्भात शिक्षण मंडळाशी संपर्क साधला असता मंडळाकडूनही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.