Fri, Jul 19, 2019 05:00होमपेज › Nashik › एप्रिल एण्डला धावणार नवी कोरी ‘पंचवटी’

एप्रिल एण्डला धावणार नवी कोरी ‘पंचवटी’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिककरांच्या जिव्हाळ्याची असलेली पंचवटी एक्स्प्रेस आता एप्रिल एण्डपर्यंत नव्याकोर्‍या लूकमध्ये धावणार आहे. रेल्वेच्या चेन्नई येथील कोचनिर्मित्ती कारखान्यात पूर्णत्वास आलेल्या तीन बोगी मनमाडकडे रवाना झाल्या असून, येत्या 15 तारखेपर्यंत उर्वरित बोग्याही दाखल होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

मनमाड-मुंबई धावणारी पंचवटी एक्स्प्रेस ही एकप्रकारे नाशिककरांचे दुसरे घरच आहे. दररोज हजारो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेची रेक बदली करून देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार रेल्वे विभागाकडून चेन्नई येथे एक्स्प्रेससाठी नव्या 22 कोचनिर्मिती केली जात आहे. चेन्नई येथील रेल्वेच्या कारखान्यातून तयार झालेल्या तीन बोगी या मनमाडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. येत्या आठवड्यात या बोगी मनमाड जंक्शनमध्ये पोहोचतील. दरम्यान, उर्वरित बोग्याही 15 एप्रिलपर्यंत मनमाडला पोहोचणार असून, तेथील वर्कशॉपमध्ये या बोगींच्या सजावटीवर अखेरचा हात फिरवला जाणार आहे.

असा आहे नवा ‘लूक’

नवीन कोचमध्ये प्रवाशांना आरामदायी सीट्स   उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छता, बायो-टॉयलेट, हवा खेळती राहण्यासाठीची सुविधा तसेच प्रत्येक सीटच्या येथे मोबाइल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वेकडे केली होती. तसा प्रस्तावच रेल्वे बोर्डाला देण्यात आला होता. या प्रस्तावावर रेल्वेनेही सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.गाडीतील स्वच्छता व इतर गोष्टींवर भर दिला जाणार आहे. देशातील पहिल्या आदर्श ट्रेनचा दर्जा मिळावा यासाठी प्रवासी संघटना प्रयत्नशील आहेत.

Tags : Nashik, Nashik News, brand new,  Panchavati, run, April End


  •