Mon, Dec 17, 2018 00:06होमपेज › Nashik › अल्पवयीन मुलीचा नदीत मृतदेह

अल्पवयीन मुलीचा नदीत मृतदेह

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उपनगर : वार्ताहर

येथे राहणार्‍या 16 वर्षीय युवतीचा जेलरोडच्या गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळला. प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.
आगरटाकळी परिसरात राहणारी ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. तिच्या आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. तिने आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. शुक्रवारी तिचा मृतदेह सापडला. ती बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी केली होती.

Tags : Nashik, Nashik News, body, minor, girl, found, river


  •