Sat, Mar 23, 2019 02:46होमपेज › Nashik › वीस ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान

वीस ग्रामपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान

Published On: May 28 2018 1:40AM | Last Updated: May 27 2018 10:51PMनाशिक : प्रतिनिधी

सात तालुक्यांमधील 20 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी (दि. 27) शांततेत मतदान पार पडले. एकूण 81.65 टक्के मतदान झाले. मतमोजणी सोमवारी (दि. 28) सकाळीच होणार आहे.सर्व ग्रामपंचायतींमध्ये सकाळी 7.30 वाजेपासूनच मतदानाला प्रारंभ झाला. मतदान केंद्रांवर पहिल्या दोन तासांत मतदानाचा जोर चांगला होता. मात्र, दुपारी 12 ते 3 या क ाळात उन्हाची दाहकता जास्त असल्याने मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात काही ठिकाणी उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरात जाऊन त्यांना मतदानाचा हक्‍क बजावण्याची विनंती केली. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच 87.73 टक्के इतकी आहे. येथे तीन ग्रामपंचायतींच्या 31 पदांसाठी मतदान पार पडले. त्याखालोखाल देवळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमधील 83.18 टक्के मतदान झाले. बागलाण तालुक्यात मात्र मतदारांमध्ये निरुत्साह पाहायला मिळाला. येथील चार ग्रामपंचायतींसाठी केवळ 69.08 टक्के मतदान झाले.

आज मतमोजणी

पाच तालुक्यांत सात ग्रामपंचायतींमधील आठ रिक्‍त जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये 92.34 टक्के मतदान झाले आहे. सिन्‍नरमधील सोमठाणेच्या दोन, तर दापूरमधील एका जागेसाठी मतदान झाले. तसेच बाभूळगाव सु. (येवला), खंबाळे (इगतपुरी), धोडांबे (चांदवड), जायखेडा (बागलाण) व दुडगाव (नाशिक) येथे प्रत्येकी एका जागेसाठी मतदान पार पडले असून आज मतमोजणी होईल.