Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Nashik › नाशिकमध्ये वडार समाजाचा मोर्चा

नाशिकमध्ये वडार समाजाचा मोर्चा

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:30PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

लातूर जिल्ह्यात वडार समाजाच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ आणि  दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मी वडार महाराष्ट्र या संघटनेने बुधवारी (दि.10) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. 

आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात वडार समाजाच्या मुलीचे अहपरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. 28 डिसेंबर 2017 ला ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपी मोकाट फिरत आहे. त्याच्या निषेधार्थ समाजबांधवांनी तेथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढला जाणार आहे. 

आरोपींना तत्काळ अटक करावी आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून खटला अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे शहर संपर्कप्रमुख अनिल शिंदे, राजेश माने, राजेश धोत्रे, शंकर नलावडे, नीलेश पवार, अनिल धोत्रे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.