Fri, Apr 19, 2019 12:05होमपेज › Nashik › जळगावमध्ये आंदोलनावेळी पोलिस चक्‍कर येऊन पडला

जळगावमध्ये आंदोलनावेळी पोलिस चक्‍कर येऊन पडला

Published On: Jul 26 2018 6:59PM | Last Updated: Jul 26 2018 7:00PMजळगाव : प्रतिनिधी

मराठा आरक्षणसाठी राज्यभर मराठा समाजावतीने आंदोलने सुरू आहेत. जळगाव येथील सकल मराठा समाजावतीने  जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळी निंभोरासिम पुलाजवळ या जलसमाधी आंदोलनाची सुरूवात झाली. या जलसमाधी आंदोलकांनी राज्यमहामार्गावर सहा तास ठिय्या आंदोलन केले. तर प्रशासनाची विनंती व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांच्या चर्चेनंतर प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन दरम्यान राज्य राखीव दलाचे हवालदार सि. एन. पवार अचानक चक्कर येवून पडल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. 

सकाळी अकरापासून निंभोरासिम पुलाजवळ आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. जोरदार घोषणा देत आंदोलनाला सुरूवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील पं. स. सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील,  संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष योगेश महाजन, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील कोंडे, शिवसेना तालुका प्रमुख योगिराज पाटील, विलास ताठे, विनोद पाटील पातोंडी, घनश्याम पाटील, आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीत गस्त

निंभोरासिम तापीनदीच्या पुलाच्याखाली जलपात्रात आपत्तीव्यवस्थापनाची नियंत्रक कक्षाचे प्रमुख रावळ आपल्या टीम सोबत नदीपात्रात गस्त घालत होते. तर रावेर तहसीलदार ढगे यांनी खासगी चार नावे पट्टीचे पोहणारे तीस जण टयूबवर बसून  नदीपात्रात गस्त घालत होते, तर आंदोलनाच्या पूर्वसंधेला तापी नदीपात्रात स्वता: तहसीलदार विजयकुमार ढगे बोटीद्वारे जाऊन तापी नदीच्या जलस्तराची माहिती घेऊन पाहणी केली 

तापी नदीच्या पुलाला छावणीचे स्वरूप 

मराठा क्रांती मोर्चाचे जलसमाधी आंदोलन सुरु होण्यापूर्वी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पुलावर छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलन दरम्यान राज्य राखीव दलाचे हवालदार सि. एन. पवार अचानक चक्कर येवून पडल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले.