Tue, Feb 19, 2019 06:11होमपेज › Nashik › तीन तलाक विरोधात मुस्लीम महिलाचा विराट मोर्चा 

तीन तलाक विरोधात मुस्लीम महिलाचा विराट मोर्चा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

व्दारका : वार्ताहर

तीन तलाक संदर्भातील विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे,या मागणीसाठी नाशिकमध्ये मुस्लिम महिलांनी मूक मोर्चा काढला होता. शरियत बचाव कमिटी नाशिक यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांनी हा मोर्चा काढला होता.

केंद्र सरकारकडून शरिया कायद्यात होत असलेल्या हस्तक्षेपाला आंदोलक महिलांनी तीव्र विरोध दर्शवला. शिवाय,तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक सरकारने तात्काळ मागे घ्यावे ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

जुने नाशिक येथील बडी दर्गा येथून या मोर्चाला सुरुवात झाली. नंतर हा मोर्चा पिंजरघाट, दुधबाजार, खडकाली, झेड.पी.मार्गे गोल्फ क्लब येथे धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला होता.

11महिलांच्या समितीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. इस्लाम धर्मात स्त्री ही कुटुंबाच प्रतिनिधित्व करते, त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली इस्लामी कायद्यात सरकार ढवळाढवळ करत आहे. ही ढवळाढवळ सहन केली जाणार नाही, असं मत यावेळी मुस्लीम महिलांनी व्यक्त केलं. शहर ए खतीब हाफीज हीसोमौद्दीन खतीब यानी विशेष दुआ पठण केली.


  •