Sat, Feb 23, 2019 20:20होमपेज › Nashik › खडसे, भुजबळांसारखे दहाजण आले तरी मी खंबीर : दमानिया

खडसे, भुजबळांसारखे दहाजण आले तरी मी खंबीर : दमानिया

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 5:06PMजळगाव : पुढारी ऑनलाईन 

माझ्यावर दाखल करण्यात आलेला खटला  खोटा आहे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्याशी लढा सुरूच राहणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.  

जर छघण भुजबळ आणि एकनाथ खडसे ‘ओबीसी’च्या नवा खाली एकत्र येऊन राजकारण करत असतील तर त्यांच्याशी लढा सुरूच ठेवणार. खडसे आणि भुजबळ यांच्यासारखे दहा जण जरी आले तरी मी लढण्यास तयार आहे. असे अंजली दमानिया पत्रकाराशी बोलताना म्हणाल्या.

दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या एका कार्यकर्त्याने दमानिया यांच्याविरोधात खामगाव  पोलिसांकडे तक्रार केली आहे. खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दमानिया यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी माधव पाटील यांनी तक्रारीत केली आहे.