Tue, Nov 13, 2018 01:32होमपेज › Nashik › टेन्ट हाउसला आग

टेन्ट हाउसला आग

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 14 2018 11:01PMमालेगाव : वार्ताहर

येथील सटाणा नाका भागातील हरिओम टेन्ट हाउसच्या  गोदामाला शनिवारी (दि.14) पहाटे दीडच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात गोदामातील मंडपाच्या सामानासह इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी आग आटोक्यात आणली.

अनिल भावसार यांच्या मालकीचे सटाणा नाका भागात हरिओम टेन्टचे गोदाम आहे. या गोदामाला लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भावसार यांनी अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांना आग लागल्याची माहिती दिली. पवार यांच्या अधिपत्याखालील जवान मधुकर बच्छाव, आरिफ बेग, वासिफ शेख आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून सहा बंबांनी आग आटोक्यात आणली. 

वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या टेन्ट हाऊस मधील गोदामात लोखो रुपयांचे साहित्य  होते. तसेच सहा भरलेले गॅस सिलेंडरही होते. मात्र वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर काम करीत हे गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.