Thu, Nov 15, 2018 07:21होमपेज › Nashik › दहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ)

दहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ)

Published On: Jan 25 2018 11:33AM | Last Updated: Jan 25 2018 12:10PMपंचवटी : देवानंद बैरागी 

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या झेप सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाच्या वतीने समूह गाण या राष्ट्रभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये २५ शाळांमधील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत समूह गाण केले. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा, उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला सशस्त्र व्हा उठा चला, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, हम युवाओंका का नारा हे भारत हमको प्यारा आदी गाणी गाण्यात आली. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.