Thu, Jun 27, 2019 14:16होमपेज › Nashik › सिन्नरला वऱ्हाडी टेम्पोला अपघात; ३ ठार, १५ जखमी

सिन्नरला वऱ्हाडी टेम्पोला अपघात; ३ ठार, १५ जखमी

Published On: Feb 20 2018 9:20PM | Last Updated: Feb 20 2018 9:20PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

सिन्नर संगमनेर रोडवर मनेगांव फाट्यावर टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याने तीन ठार तर १५ जण जखमी झाले आहेत

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापुर येथील सुभाष सभाजी आव्हाड यांच्या मुलीचे शहरातील लग्न आटपून वऱ्हाडी टेम्पोने परतत होते. मनेगाव  फाट्याजवळ सोमरून येणाऱ्या रॉकेल टँकरने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात मालताबाई शिवाजी आव्हाड (वय ४५), रामदास कचरू आव्हाड (वय ५२), बबन कचरू आव्हाड (वय ६१) या तिघांचा मृत्यू झाला जण ठार तर १५ जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.