Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Nashik › नाशिक : टेम्पो अपघातात १ ठार; २५ जखमी 

नाशिक : टेम्पो अपघातात १ ठार; २५ जखमी 

Published On: Feb 09 2018 7:07PM | Last Updated: Feb 09 2018 7:07PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर विष्णूनगर येथे टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी १० जण गंभीर असल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर एमआयडीसी येथील म्हसोबा यात्रा करुनघरी जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. यामध्ये येवला तालुक्यातील नागडे गावचे रहिवाशी होते. निफाड तालुक्यातील विष्णूनगर येथे टेम्पोला अपघात झाला. यात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातातील जखमींवर निफाड येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.