Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Nashik › शिक्षक मतदारसंघ; आज मतमोजणी

शिक्षक मतदारसंघ; आज मतमोजणी

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:17PMनाशिक : प्रतिनिधी 

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची गुरुवारी (दि.28) अंबड येथील वेअर हाउसमध्ये सकाळी आठपासून मतमोजणी होणार आहे. प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून, 20 टेबलांवर मतमोजणी केली जाईल.  मंगळवारी (दि.26) शिक्षक मतदारसंघासाठी विक्रमी 92.30 टक्के इतके मतदान झाले होते. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. शिक्षक कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जादा मतदानामुळे निकाल हाती येण्यास रात्री उशीर होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मीदर्शन, साड्या व पैठणी वाटप, रात्रीची पंगत या सर्व कारणांमुळे कधी नव्हे ती नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नको त्या अर्थाने चर्चेचा विषय ठरली होती. निवडणुकीच्या रिंगणातील 16 उमेदवारांनी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. गुरुजींच्या आखाड्यात आरोप - प्रत्यारोपांची राळ उडाल्याने ही निवडणूक गाजली होती. मंगळवारी शिक्षक मतदारसंघासाठी कधी नव्हे ते रेकॉर्डब्रेक 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. पाऊस असतानाही मतदानासाठी शिक्षकांचा दांडगा उत्साह पाहायला मिळाला होता. त्यानंतर आज शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे. विभागातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर येथील मतपेट्या या सील करून एक दिवस अगोदरच चोख पोलीस बंदोबस्तात अंबड येथील मतमोजणी केंद्रावर नेण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी फक्त उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राबाहेरील ठराविक अंतराबाहेर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येईल. मतमोजणी वेळी निवडणूक अधिकारी विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा निश्‍चित करतील. मात्र, 16 उमेदवार रिंगणात असल्याने विजयासाठी आवश्यक मते मिळविणे अवघड ठरणार आहे. त्यामुळे दुसर्‍या क्रमाकांच्या पसंतीची मतेच जय-पराजयाचे गणित निश्‍चित करतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहण्याची चिन्हे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त राजाराम माने हे काम पाहणार आहेत.

रिंगणातील प्रमुख उमेदवार 

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अनिकेत पाटील (भाजपा), किशोर दराडे (शिवसेना पुरस्कृत), संदीप बेडसे (राष्ट्रवादी व टीडीएफ बोरस्ते - मोरे गट पुरस्कृत, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे व भाऊसाहेब कचरे पाटील (टीडीएफ-निरगुडे बादशहा गट), सुनील पंडित (शिक्षक परिषद), शाळीग्राम भिरुड या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आह