Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Nashik › शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा; शिक्षकांचा निर्धार

शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा; शिक्षकांचा निर्धार

Published On: Jun 04 2018 5:36PM | Last Updated: Jun 04 2018 5:36PMनाशिक: वार्ताहर

शिक्षकांचा आमदार शिक्षक हवा. गेल्या सहा वर्षात असणारा अनुभाव शिक्षकांना चांगला आला नाही. शिक्षकाचा प्रतिनिधी विधान परिषदेत पाठवला तरच शिक्षकांच्या समस्या सुटतील म्हणून महाराष्ट्रात सात आमदार पैकी एकच आमदार शिक्षक आहे. ही महाराष्ट्राच्या लोकशाहीची खंत म्हणावी लागेल. शिक्षक लोकशाही आघाडीचे आज पर्यंत झालेले सर्व लोकप्रतिनिधी हाडाचे शिक्षक राहिले आहे. म्हणून त्यांनी सभागृहात शिक्षकांचा आवाज बुलंद केला, असे प्रतिपादन महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी शिक्षक लोकशाही आघाडीचा मेळावा पाटीदार भवन नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आला होता .या वेळी साडेतीन ते चार हजार शिक्षक उत्तर महाराष्ट्रातून या वेळी उपस्थित होते. शिक्षक नेते शिवाजी राव निरगुडे म्हणाले कि, आमचा उमेदवार शिक्षक असल्याने त्याला शिक्षण क्षेत्राच्या आणि शिक्षकांच्या समस्या माहित आहे. सभागृहात शिक्षकांची बाजू मांडणारा शिक्षकच असावा म्हणून आम्ही कचरे यांना उमेदवारी दिलेली आहे. 

भाऊसाहेब कचरे पाटील म्हणाले कि, शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मला संघटनेने उमेदवारी दिलेली असून शिक्षकांची ताकद संघटनेच्या मागे आहे. म्हणून माझा विजय निश्चित होईल असा विश्वास वाटतो. मुख्याध्यापक संघाचे एस.बी.देशमुख म्हणाले कि शासनाने एका वर्षात ५३४ शासन निर्णय जाचक काढले दर दिवशी शासन शिक्षकांच्या बाबतीत चुकीची धोरणे राबवत आहे. कार्पोरेट शाळांमुळे शिक्षक समस्यांचा सामना करीत आहे. म्हणून शिक्षक लोकशाही आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी उभा केला आहे.