Sun, Jul 21, 2019 10:13होमपेज › Nashik › नाशिक सायकलिस्ट्सतर्फे ‘टँडम सायकल राइड’

नाशिक सायकलिस्ट्सतर्फे ‘टँडम सायकल राइड’

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:24AMनाशिक : प्रतिनिधी

व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्‍वभूमीवर नाशिक सायकलिस्टतर्फे बुधवारी (दि. 14) ‘टँडम सायकल राइड’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कॉलेज रोडवरील प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक येथून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमस्थळी एकूण सात टँडम सायकली ठेवण्यात आल्या होत्या. व्हॅलेंटाइन डे निमित्त दोन इच्छुक व्यक्तींना त्यांचे नाव नोंदवून टँडम सायकलचा एक राउंड दिला जात होता. यामध्ये फक्त कपल्स नसून, आई-मुलगी, दोन मित्र, वडील-मुलगी असे कोणीही दोन जण या राइडसाठी सहभागी होऊ शकत होते.

यावेळी ज्यांनी नाव नोंदणी केली तसेच लकी ड्रॉ कूपन भरले. त्यांच्यातल्या एका विजेत्याला एक टँडम सायकल गिफ्ट म्हणून मिळणार आहे. कार्यक्रमास अंकुर सुराणा, संजय देवरे, विलास बिरारी, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, नितीन भोसले, वैभव शेटे, श्रीकांत जोशी, डॉ. मनीषा रौंदळ आदी उपस्थित होते. 

अशी आहे टँडम सायकल

टँडम सायकल ही एक विशिष्ट प्रकारची सायकल आहे. ही सायकल दोन व्यक्‍ती मिळून चालवावी लागते. सायकलला दोन वेगवेगळी सीटस्, पँडल, हॅण्डल आहेत. तसेच बॅक सपोर्टसाठी बॅकरेस्ट सुद्धा असते.