Mon, Nov 19, 2018 23:05होमपेज › Nashik › स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूचा धोका वाढला असून, सोमवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लू कक्षात 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बबिता अमरिश विश्‍वकर्मा (42, रा. शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा वैद्यकीय अहवाल प्रलंबित असल्याने तिला स्वाइन फ्लू होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

बबिता विश्‍वकर्मा यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथील रुग्णालयाने त्यांचा स्वॅब प्रयोगशाळेत पाठवला, मात्र, बबिता यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रविवारी (दि.2) दुपारी साडेतीन वाजता जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आलेे. उपचारादरम्यान, त्यांचा पहाटे मृत्यू झाला. बबिता यांचा खासगी रुग्णालयाकडील वैद्यकीय अहवाल अद्याप मिळालेला नसून जिल्हा रुग्णालयाने त्यांचा स्वॅब घेतला असून, तो प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.