Sat, Mar 28, 2020 16:26होमपेज › Nashik › धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 

धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 

Last Updated: Mar 01 2020 1:01AM
 

 

 

 

 

अथेन्स (ग्रीस) : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रातील धुळ्यातील सुषमा गिरासे राजपूत यांच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. सुषमा राजपूत या ग्रीसमध्ये फार्माथेन या युरोपातील सर्वांत मोठ्या फार्मा कंपनीत क्वालिटी कंट्रोल (यूएसएफडीए) सिनियर मॅनेजर पदावर काम करत आहेत. विशेष म्हणजे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सुषमांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच त्यांच्यासोबतचा सेल्फी फोटो देखील पोस्ट केला आहे.

वाचा : राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा

सुषमा गिरासे राजपूत या धुळ्याच्या जयहिंद कॉलेजच्या १९९३ बॅचच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी मायक्रो बायोलॉजीमधून शिक्षण घेतले आहे. त्यांचे माहेर धुळे आणि सासर चाळीसगाव (जि. जळगाव) येथील आहे.

वाचा : सावरकर गौरव प्रस्ताव विधानसभाध्यक्षांनी फेटाळला

पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी सापेस रोडोपीतील सर्वांत आधुनिक औषध उत्पादक घटक असलेल्या फर्माथेनला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी कंपनीच्या कामकाजाचे कौतुक केले. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी कंपनीचे व्यवस्थापन व कर्मचार्‍यांशी संवाद साधला. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी यांना फार्माथेनच्या संचालक मंडळाचे सदस्य वासिलिस कॅटोस यांनी कपंनीची माहिती दिली. यावेळी ग्रीसचे पंतप्रधान मित्सोटाकीस यांनी सुषमांच्या कामगिरीचे कौतुक केले.