होमपेज › Nashik › दोन शेतकर्‍यांच्या निफाडमध्ये आत्महत्या

दोन शेतकर्‍यांच्या निफाडमध्ये आत्महत्या

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

निफाड तालुक्यात दोघा शेतकर्‍यांनी नैराश्येतून जीवनप्रवास संपविला. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे नावे विनायक शिरसाट (39, रा. मौजे दिंडोरी) व अमोल गाजरे (25, निफाड) आहेत. गेल्या आठवडाभरात सहा  शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

अमोल गाजरे याने रविवारी (दि.21) रात्री 8.15 वाजेला विषारी औषध प्राशन केले होते. त्याला प्रथम निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी (दि. 22) पहाटे 5 वाजेच्या सुमारास अमोल याचा मृत्यू झाला.

अमोलच्या नावे कोणतीही जमीन नाही. दुसर्‍या घटनेत  विनायक शिरसाट यांनी शनिवारी (दि. 20) दुपारी अडीच ते तीन यावेळेत विषारी औषध प्राशन केले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्याचदिवशी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मयत शिरसाट यांचे नावे जमीन नाही.