Tue, Mar 19, 2019 15:46होमपेज › Nashik › उद्योजक खरोटे यांच्या पुत्राची आत्महत्या 

उद्योजक खरोटे यांच्या पुत्राची आत्महत्या 

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 2:03AMनाशिक : प्रतिनिधी

गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगर परिसरात राहणार्‍या 25 वर्षीय युवकाने शुक्रवारी (दि.6) रात्री आठच्या सुमारास राहत्या घरात घरगुती गॅसची नळी तोंडात ठेवून गॅस पित आत्महत्या केली. अंजिक्य उदय खरोटे असे या युवकाचे नाव आहे. निमा संघटनेचे उपाध्यक्ष उदय खरोटे यांचा तो मुलगा होता. 

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजिक्य याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरात कोणी नसताना घरगुती गॅसची नळी काढून तोंडात धरली. त्यानंतर त्याने एलपीजी गॅस सुरू केल्याने तो गॅस अजिंक्यच्या शरीरात सर्वत्र पसरला. त्यामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला. दरम्यान, अजिंक्यच्या नातलगांनी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. अजिंक्यच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Tags : Nashik, Suicide, son,  entrepreneur, Kharote