Tue, Mar 26, 2019 08:01होमपेज › Nashik › दोन शेतकर्‍यांची आत्महत्या 

दोन शेतकर्‍यांची आत्महत्या 

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:35AMनाशिक /देवळा : वार्ताहर

कर्जाला कंटाळून जिल्ह्यात दोघा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील आशोक दगा काकुळते (53) यांनी गुरूवारी (दि. 18) दुपारी 4 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसर्‍या घटनेत खामखेडा  (ता. देवळा) येथील तरुण शेतकरी नारायण पंडित शेवाळे (39 वर्षे) याने बुधवारी (दि. 17) रात्री स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळुन गेल्या पाच दिवसात तीन शेतकर्‍यांनी त्यांचा जीवनप्रवास संपविला आहे. 

मयत आशोक काकुळते कंधाणे येथील खातेदार आहेत. तसेच मयत नारायण शेवाळे यांनी खामखेडा विविध कार्यकारी सेवा सोयायटीकडून दोन प्रकारचे कर्ज घेतले होते. हे कर्ज 84 महिन्यांपेक्षा जास्त महिन्याचे असल्याने शासनाच्या कर्जमाफीत दीड लाखांपेक्षा जास्त आल्याने मध्यम मुदत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.