होमपेज › Nashik › शेतकरी महिलेची गिरणा धरणात आत्महत्या

शेतकरी महिलेची गिरणा धरणात आत्महत्या

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:48PMमालेगाव : प्रतिनिधी

तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेरुळ येथील 63 वर्षीय सुशीलाबाई वसंत सोनवणे या शेतकरी महिलेने कर्जाला कंटाळून गिरणा धरणात उडी घेत जीवनसंघर्ष संपविला आहे. सोमवारी (दि.4) परिसरातील मच्छिमार हे मासेमारीसाठी गिरणा धरणावर गेले होते. सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान त्यांना सोनवणे या मृतावस्थेत आढळल्या.

त्यांनी भ्रमणध्वनीवरुन ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. सोनवणे यांच्या शेतातील गट नंबर 191/3/1 वर दीड लाख रुपयांचा बोजा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सायंकाळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी शेरुळला भेट देऊन आत्महत्याग्रस्त महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.