Thu, Feb 21, 2019 04:58होमपेज › Nashik › विद्यार्थी खाताहेेत सडका भाजीपाला!

विद्यार्थी खाताहेेत सडका भाजीपाला!

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:57PM

बुकमार्क करा
सुरगाणा : वार्ताहर

कळवण आदिवासी विकास  विभागांतर्गत सराड येथील शासकीय  आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्‍क सडका भाजीपाला दिला जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार उघड झाला आहे. या शाळेला पंचायत समिती सभापती सुवर्णा गांगोडे यांच्या पथकाने भेट दिली असता, हे वास्तव समोर आले.

या पथकाने शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली असता, अनेक शैक्षणिक  उणिवा निदर्शनास आल्या. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांतील विद्यार्थ्यांना जीवशास्त्राच्या शिक्षिकेला भौतिकशास्त्र व गणित विषयाचे अध्यापन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना इंग्रजीतून साधे एक वाक्यही वाचता येत नाही.त्याचप्रमाणे जेवणात सडका भाजीपाला ठेकेदार वापरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य  धोक्यात आले आहे. यासारखीच परिस्थिती अनेक शासकीय आश्रमशाळांत असल्याचे दिसून येते.