Sat, Jul 20, 2019 08:33होमपेज › Nashik › घोटीत आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

घोटीत आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 12:30AMघोटी : प्रतिनिधी

घोटी शहरात रविवारी (दि.18) रात्री 7 ते 8 च्या दरम्यान अत्यंत हृदयद्रावक घटनेमध्ये एका लहान मुलाने आत्महत्या केल्याने श्रीरामवाडी परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली. घोटी शहरात वास्तव्यास आलेले परराज्यातील एका बंगाली कुटुंबात श्रीरामवाडी परिसरात एका संकुलात राहत असून, त्यांचा एकुलता एक मुलगा अनिरुद्ध अमित दास (13, इयत्ता आठवी) इगतपुरी येथील वंडरलँड इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत शिकत होता.

गुढीपाडवा सणाच्या दिवशी परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून घरातील शयनयान कक्षेत जाऊन पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. त्यात अनिरुद्धची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती अनिरुद्धचे नातेवाईक अनुपम संतोष दास (रा. इगतपुरी) यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिली. रात्री मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

Tags : nashik, Ghoti news, suicide, Student, Student Suicide,