Sat, Apr 20, 2019 10:34होमपेज › Nashik › दमदार पाऊस; दारणा, गोदेला पूर

दमदार पाऊस; दारणा, गोदेला पूर

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 11:10PMनाशिक : प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने गोदेला दुसर्‍यांदा पूर आला आहे. तर जिल्ह्यातील धरणांमधील साठाही समाधानकारक झाला असून, विसर्ग सुरू आहे. आधी पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने श्रावणात  मात्र मुक्काम ठोकला आहे. जोर नसला तरी संततधार असल्याने खरीप हंगामातील पिकांनाही जीवनदान मिळाले आहे.

मध्यंतरी पावसाअभावी पिके करपायला लागली होती. पावसामुळे मात्र शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील साठा समाधानकारक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीला हंगामातील दुसर्‍यादा पूर आला आहे. गोदावरी दुथडी वाहत आहेत. नदी-नालेही दुथडी ाहून लागले आहेत. 

बुधवारी शहरात पावसाची रिमझिम थांबल्याचे दिसून आले. दिवसभर  विश्रांती घेत श्रावणसरी कोसळत होत्या. यादिवशीही सूर्यदर्शन होऊ शकले नाही. ग्रामीण भागात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र होते.