Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Nashik › मनमाड रेल्‍वे स्‍थानकात रूळाला तडा 

मनमाड रेल्‍वे स्‍थानकात रूळाला तडा 

Published On: Jan 09 2018 8:24PM | Last Updated: Jan 09 2018 8:24PM

बुकमार्क करा
मनमाड : प्रतिनिधी

रेल्वे स्थानकातील प्लॉट फॉर्म दोनच्या डाऊन लाईनच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना ११ वाजता घडली. तडा गेला तेंव्हा गीतांजली एक्स्प्रेस या रुळावरून धावत होती मात्र, सुदैवाने अपघात टळला. रेल्वे स्थानकावरील दोन वेटरांना रुळाला तडा गेल्याचे दिसल्यानंतर त्यांनी स्टेशन मास्तराला याची महिती दिली. त्यानंतर रुळाची दुरुस्ती करण्यात आली. या घटनेमुळे काही गाड्या इतर प्लॉट फॉर्मवरून सोडण्यात आल्या.