होमपेज › Nashik › राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे २७ जानेवारीला मुंबईत अधिवेशन

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे २७ जानेवारीला मुंबईत अधिवेशन

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:23AMमालेगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन मुंबई येथे दि. 27 जानेवारी रोजी होत आहे. त्यासाठी राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते, एजंट यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटन सचिव रविंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.

अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा करावी, विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे. याबाबत अध्यक्ष हरी पवार, उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, सचिव संजय पावसे, सरचिटणीस बालाजी पवार यांनी मुंबई येथे आढावा बैठक घेतली. राज्य संघटनेच्या कार्यकारीणीची बैठक मुंबईत दि. 26 रोजी होणार आहे. त्यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे.

दुसर्‍या दिवशी (दि. 27) शिरोडकर सभागृह, के. एम. हॉस्पिटल, परळ येथे अधिवेशन होईल. त्यासंबधी अधिक माहितीसाठी राज्य संघटनेचे संघटन सचिव रवींद्र कुलकर्णी, पापा यादव, वाल्मीक पगारे, अशोक नागमोती, भूषण अलई, संजय तरवटे यांच्याशी संपर्क साधावा. शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त वृत्तपत्र विक्रेता व एजंट यांनी अधिवेशनाला उपस्थिती लावावी, असे आवाहन मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केले आहे.