Fri, Jan 18, 2019 10:55होमपेज › Nashik › आदिवासी उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पास प्रारंभ

आदिवासी उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पास प्रारंभ

Published On: Jun 29 2018 12:05AM | Last Updated: Jun 28 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

आदिवासी बहुल ग्रामीण भागात गरीब व वैफल्यग्रस्त कुटुंबातील महिलांना उपजीविकेची जाणीव करून त्यांची प्रगती व्हावी या हेतूने इंडिगो सी. एम. आर. पुरस्कृत, अफार्म संस्था व महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ यांच्या संयुक्‍त विद्यमाने कोटंबी येथे महिला सक्षमीकरण प्रकल्पाचे उद्घाटन झाले. 

यामध्ये महिलांना प्रकल्प संरचना, हेतू, उद्देश व प्रकल्प अंमलबजावणी याविषयी प्रकल्प व्यवस्थापक सतीश नागटिळक यांनी माहिती दिली. प्रकल्पामध्ये आदिवासी भागातील पाच गावांमध्ये एक हजार कुटुंबाबरोबर पाच वर्षे शाश्‍वत शेती, पशुपालन, बिगरशेती व शासकीय योजनांद्वारे उपजीविकेची जाणीव करून त्यांना सक्षम करणे व त्यांचे राहणीमान जीवनमान उंचावणे हा प्रकल्पामागील उद्देश आहे.

याप्रसंगी कोटंबी ग्रामपंचायत सरपंच योगिता अवतार, पोलीसपाटील पांडुरंग मौले, कार्यकर्ते रामदास चौधरी, बाळासाहेब भाये उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमृत भोये, भूषण अहिरे आदींनी परिश्रम घेतले.