Thu, Feb 21, 2019 17:49होमपेज › Nashik › इगतपुरीत झाली होती श्रीराम-सुग्रीवाची भेट

इगतपुरीत झाली होती श्रीराम-सुग्रीवाची भेट

Published On: Mar 25 2018 10:55AM | Last Updated: Mar 25 2018 10:55AMघोटी : प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव येथेच रामायण काळात श्रीराम व सुग्रीवाची भेट झाल्याचा दावा असून, ही तत्कालीन किष्किंधानगरी सध्या मात्र विकासापासून वंचित आहे.

नाशिकपासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुशेगावाविषयी रामायणात आख्यायिका असून, हे ठिकाण पंपासरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रांनी येथेच बाण मारून तीर्थाची निर्मिती केल्याचेही दाखले आहेत. या परिसरात जिल्हाभरातून भाविक येत असतात. मात्र, पर्यटन व धार्मिक स्थळाच्या दर्जापासून हे तीर्थ अद्याप वंचितच आहे. 

सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या व चारही बाजूने डोंगर-दर्‍याने वेढा दिलेल्या किष्किंधानगरीला धार्मिक स्थळाचा वारसा लाभला आहे. रामभक्त शबरी मातेचेदेखील याठिकाणी मंदिर आहे. येथे योगी शिवनाथजी महाराज हे कार्यरत आहेत. हनुमानाचे जन्मस्थळ असलेल्या अंजनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच कुशेगाव वसलेले आहे. या ठिकाणी राममंदिर असून, ते पूर्णपणे पडण्याची वेळ आली आहे. तरीही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Tags : Sri Ram, Sugriva, Igatpuri, Ram Navami