Sun, Mar 24, 2019 12:24होमपेज › Nashik › नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दोर्जे

नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दोर्जे

Published On: May 31 2018 1:43AM | Last Updated: May 30 2018 10:35PMनाशिक : प्रतिनिधी

भारतीय पोलीस सेवेतील काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने बुधवारी (दि.30) काढले. त्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची मुंबईला आर्थिकगुन्हे शाखेत सहपोलीस आयुक्‍तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी छेरिंग दोर्जे हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालकपदाची जबाबदारी अश्वती दोर्जे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.  चौबे यांनी 1 जानेवारी 2016 रोजी नाशिक परिक्षेत्रचा कार्यभार स्वीकारला होता. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालकपद अनेक दिवसांपासून रिक्‍त होते.