Thu, May 23, 2019 15:19
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › सोशल मीडियात कर्जबुडवे ‘हिट’

सोशल मीडियात कर्जबुडवे ‘हिट’

Published On: Feb 20 2018 9:39AM | Last Updated: Feb 20 2018 10:45AMनाशिक : प्रतिनिधी

मद्यसम्राट विजय मल्या यांच्या फसवेगिरीचे प्रकरण गाजत असतानाच आता उद्योगपती नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला सुमारे अकरा हजार कोटी रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची देशभरात विविधांगी चर्चा होत असतानाच नेटीझनमध्येही चांगलीच फटकेबाजी सुरू आहे. अनेकांनी याबाबत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मार्मिक प्रश्‍न उपस्थित करत सरकारच्या धोरणांची खिल्ली उडविली आहे. तर सर्वसामान्यांना आधारकार्डपासून गॅस सबसिडीसाठी नियम दाखवणारी यंत्रणा कोट्यवधींच्या घोटाळ्यात कशी मूग गिळून गप्प बसते याच्याही बोलक्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. अशा एक ना अनेक पोस्टमुळे सोशल मीडियात सध्या मनोरंजनाचे तुषार उडताना दिसत आहेत. यापैकीच या काही मजेशीर पण तितक्याच मार्मिक पोस्ट चांगल्याच हिट ठरल्या आहेत.

बँकांचा नवीन नियम.
पासपोर्ट असणार्‍यांना कर्ज मिळणार नाही....surprise

पंजाब बँकेत आज नीरव शांतता होती...!cheeky


मित्रांनो,
कामावर ध्यान द्या, 
चांगला पगार घ्या अन् आयटी वेळच्या वेळी भरा
11500 करोड रुपयांचा टॅक्स भरायचा आहे.angry


प्रश्‍न : 
ललित मोदी, विजय मल्या, नीरव मोदी यांच्याकडून काय शिकलं पाहिजे?
उत्तर :  कांड केल्यावर वकिलाकडे जाण्याऐवजी ट्रॅव्हल एजंटकडे जा, नाहीतर भुजबळ होईल.laugh

 

मुळात नीरव आणि मोदी हे शब्दच विरुद्धार्थी शब्द आहेत....

 

दो रुपये की पेन को सुतली से बांधनेवाले बँक 11500 करोड डुबा के बैठे है ! 

 

ही  काय फालतुगिरी आहे,  मी पण आडनाव मोदी करतो... पण मला सोडा......भुजबळcrying

 

हजार कोटींचे लोन केल्यावर पासपोर्ट आणि व्हिसा बँकाच काढून देतात म्हणे....

काँग्रेसने 60 वर्षात देशाला 5 गांधी दिले.
भाजपने 4 वर्षातच 4 मोदी दिले.
याला म्हणतात विकास!!

नीरव मोदी इंदिरा गांधी विमानतळावरून पळाले, जर त्याचे नाव दीनदयाळ उपाध्याय असेत तर इमारतीनेच मोदींना पकडले असते....

कृपया, उर्जित पटेल यांना फेसबुक किंवा ट्विटरवर टॅग करू नये. लक्ष विचलित झाले की, पुन्हा पहिल्यापासून नोटा मोजायला लागतात.

सरकारने नीरव मोदीचं आधार कार्ड रद्द केलं आहे. 
आता त्याच्याजवळ रुपये तर 11000 कोटी असतील पण तो 
मोबाइल फोनचं सिमकार्ड घेऊ शकणार नाही... 
आणि आधार रद्द झाल्यामुळे त्याला गॅस सबसिडीसुद्धा 
मिळणार नाही. बस म्हणावं बोंबलत........
याला म्हणतात मास्टरस्ट्रोक....!!!


रवि सुब्रमण्यम् यांचे गेल्या वर्षी एक पुस्तक प्रकाशित झाले. 
ते बँकेतील अफरातफरीच्या गोष्टीवर आधारित आहे. त्यातील प्रमुख अफरातफर करणार्‍यांचे नाव नीरव चोक्सी असे दाखविले आहे. 
सध्याच्या पीएनबी प्रकरणात दोन प्रमुख संशयित आहेत. त्याची नावे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी आहेत. याच दोन नावाचा या पुस्तकातील आरोपींच्या नावाचा संयोग असावा...हा अजबच योगायोग म्हणावा लागेल....


पंजाब नॅशनल बँकेचा नीरव मोदी यांच्या नावे संदेश..
प्रिय मोदी,
11 हजार कोटी ही काही फार मोठी गोष्ट नाही, ती आम्ही योग्य वेळेत मिळवू पण, तुम्ही 31 मार्चपर्यंत अकाऊंट आधारशी जोडले नाही तर, होणारे परिणाम गंभीर असतील. तुमचे खाते गोठविण्यात येईल.
-आपली पंजाब नॅशनल बँक 

वेगवेगळ्या बँकांच्या घोटाळ्यातील कर्मचार्‍यांचा सहभाग पाहता बँकांनी आता केवायसी (नो युवर कस्टमर) ऐवजी केवायई (नो युवक एम्प्लॉयर) फार्म भरायला हवा...