Sun, Mar 24, 2019 06:40होमपेज › Nashik › ..अन्यथा सुकाणू समिती निवडणुकीच्या रिंगणात

..अन्यथा सुकाणू समिती निवडणुकीच्या रिंगणात

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:03PM

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू होतो. शेतीमालाला हमीभाव व स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू न होणे हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी सुकाणू समिती पाठपुरावा करत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्यास सुकाणू समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत शेतकरी संघटनेचे नेते व सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील यांनी दिले.

तालुक्यातील चापडगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सुकाणू समितीचे सदस्य गणेश जगताप, किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे दिनकर दाभाडे, शिवाजी नादखिळे, उदय सांगळे आदी उपस्थित होते. मोदी व फडणवीस सरकारने सत्तेवर येण्याआधी शेतकर्‍यांच्या प्रत्येक मालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, सरकारच्या

चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला.त्यामुळे शेतकर्‍यांनी एक रुपयाही कर्ज न भरण्याचे आवाहन करत पाटील यांनी भाजपा सरकार लुटारू सरकार असल्याची टीका केली. कारखानदारांच्या फायद्यासाठी कांद्याचे भाव पाडले जात आहे. कांदा निर्यातमूल्य 850 डॉलर प्रतिटन केले आहे. यामुळे अप्रत्यक्ष निर्यातबंदी झाली आहे. कारखानदार कांद्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर बनवून विदेशात जादा भावाने विकून मोठ्या प्रमाणात नफा कमावतात.सरकार शेतकर्‍यांपेक्षा उद्योजकांचेच  असल्याचा आरोप पाटील यांनी  केला.