Sun, Oct 20, 2019 01:09होमपेज › Nashik › पांगरीला कार अपघातात एक ठार; आठ जखमी

पांगरीला कार अपघातात एक ठार; आठ जखमी

Published On: Dec 12 2017 2:12AM | Last Updated: Dec 12 2017 2:12AM

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पांगरी शिवारात सोमवारी (दि.11) दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्विफ्ट आणि इर्टिका कार यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. पांगरी शिवारातील साईशोभा पेट्रोलपंपासमोर शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने येणार्‍या स्विफ्ट कार (एमएच 04 इडी 5860) आणि सिन्नरहून शिर्डीच्या दिशेने जाणार्‍या इर्टिका कार (एमएच 48, ए-7232) यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात मुंबईच्या नालासोपारा येथे राहणारे चैतन्य सत्यनारायण रतनफुलम (31), रेणुकादेवी चैतन्य रतनफुलम (26), विशाल उदयकुमार गुप्ता (18), कम्सीना पिंटू अलीमहमंद (29), पवन गोयल (25), तर वसई येथे राहणारे नीलेश वाळुंजकर, विलासकुमार, भरतसिंग आदींसह अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी नाशिक तसेच सिन्नर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच पवन गोयल याची प्राणज्योत मावळली. तर तिघा प्रवाशांची परिस्थिती चिंताजनक आहे. याप्रकरणी वावी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.