Wed, Aug 21, 2019 02:06होमपेज › Nashik › समृद्धी : कर्मचार्‍यांना ग्रामस्थांनी पिटाळले

समृद्धी : कर्मचार्‍यांना ग्रामस्थांनी पिटाळले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिन्‍नर : प्रतिनिधी

मुंबई -नागपूर समद्धी महामार्गाच्या वाटेतील शिवडेकरांचा अडथळा काही केल्या कमी व्हायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिवडेतील शेतकर्‍यांमध्ये दोन गट पडले असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना रविवारी (दि.25) सकाळी 11.30 च्या सुमारास जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना संतप्त शेतकर्‍यांनी हुसकावले. त्यामुळे समृध्दी महामार्गाविरोधातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

शिवडे घाटात घोरवड गावाच्या हद्दीत सकाळी 11.30 च्या सुमारास 10 ते 12 अधिकारी, कर्मचारी शेतजमिनीची मोजणी करीत असल्याचे उत्तम हारक या शेतकर्‍याला दिसले. विचारपूस केली असता त्यांनी रस्त्यांसंदर्भातील मोजणी करीत असल्याचे सांगितले. ड्रोन कॅमेर्‍याने मोजणी     आमचे अधिकारी व कर्मचारी आज सुट्टीवर आहेत. प्रत्यक्ष जागेवर गेलेले अधिकारी हे प्रकल्पासाठी निविदा भरलेल्या एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे होते. त्यांनी जाण्यापूर्वी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. सर्व्हेक्षणाला जाताना यापुढे पुर्व परवानगी घेऊनच जाण्याच्या 
सूचना कंपनीच्या अधिकार्‍यांना देण्यात येतील. राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

समृद्धी : कर्मचार्‍यांना  ग्रामस्थांनी पिटाळले

करण्याबाबतचे परवानगी पत्रदेखील दाखवले. कर्णोपकर्णी याबाबातची माहिती गाव शिवारात पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी गोळा झाले. जमलेल्या शेतकर्‍यांनी मोजणी कर्मचार्‍यांना घेराव घालून काम बंद पाडले. कर्मचार्‍यांना गावातील मारुती मंदिरासमोर आणले. तेथे त्यांच्याकडील मोजणी कॅमेरा स्टँड व साहित्य जप्त करण्यात आले. शिवडेकरांची एकजूट फोडण्याचा डाव करुन प्रशासन समृध्दी महामार्गाची वाट सोपी करु पाहात असल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. याप्रकाराने परिसरातील वातावरण पुन्हा तंग झाले आहे. 

दरम्यान, शेतकर्‍यांनी मोजणी कर्मचार्‍यांना मारुती मंदिरात डांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कर्मचार्‍यांना पुढे करुन अधिकारी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत काही शेतकर्‍यांनी मांडले. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना दुपारी 4.30 च्या सुमारास साहित्यासह गावाबाहेर काढून देण्यात आले. यावेळी सोमनाथ वाघ, उत्तम हारक, रावसाहेब हारक, भास्कर वाघ, हरिभाऊ शेळके, सुनील चव्हाणके, प्रकाश हारक, सचिन शेळके, किरण हारक, ज्ञानेश्‍वर चव्हाणके, आदींसह सुमारे दोनशेवर शेतकरी जमा झाले होते.

सुकाणू समिती 1 एप्रिलला शिवडेत

समृध्दी महामार्गासाठी होणारे सक्तीचे भूसंपादन, संपूर्ण कर्जमाफीची मागणी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे या संदर्भाने राज्य सुकाणू समिती शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार आहे. 1 एप्रिल रोजी नाशिकच्या हुतात्मा स्मारकात क्रांतीकारकांना अभिवादन करुन समितीच्या जनजागृतीस सुरुवात होणार असल्याची माहिती कॉम्रेड राजू देसले यांनी दिली. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता शिवडे येथे सभा होणार असून यावेळी रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले, डॉ. अजित नवले, राजू देवले, करण गायकर, गणेशकाका जगताप, प्रतिभा शिंदे, सुशिला बोराळे अदी उपस्थित राहणार आहेत.
 

 

 

tags :Sinnar,news,Prosperity, highway, Sivadeon, farmers , opposition, 


  •