Tue, May 21, 2019 23:12होमपेज › Nashik › मुसळगाव सेक्स रॅकेट; 'त्या' पीडितेचा इन कॅमेरा जबाब

मुसळगाव सेक्स रॅकेट; 'त्या' पीडितेचा इन कॅमेरा जबाब

Published On: Dec 20 2017 1:42AM | Last Updated: Dec 20 2017 1:42AM

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

मुसळगाव सेक्स रॅकेट प्रकरणातील पिडीत युवतीची मंगळवारी (दि.19) इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. तब्बल तीन तास जबाब नोंदविण्याचे कामकाज सिन्नर न्यायालयात सुरू होते. मात्र, वीजेचा खोळंबा झाल्याने कामकाज थांबविण्यात आले असून बुधवारी (दि.20) सकाळी पुन्हा पिडीतीचे जबाब घेण्याचे काम पुर्ण केले जाणार आहे.

दुपारी तीन वाजता सिन्नर न्यायालयातील  न्यायधीश डी.एस जाधव यांच्यासमोर स्थानिक गुन्हे अनुवेष विभागाच्या तीन महिला पोलिस कर्मचार्‍यांनी पिडीत महिलेला हजर केले. त्यानंतर बंद खोलीत न्यायधीश, पिडीत युवती आणि एक महिला टायपिस्टच्या उपस्थित सदर जबाब नोंदविण्याचे काम सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. मात्र, वारंवार वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने जबाब नोंदविण्याचे काम थांबविण्यात आले. त्यानंतर पिडीतेला पोलिसांनी नाशिक येथे हलविण्यात आले. 

देहविक्रीसाठी सख्ख्या मावशीनेच पिडीत युवतीचा सौदा करत तिची सिन्नर, मुंबई आणि कोलकाता येथे विक्री केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. त्यामुळे सदर प्रकरणामुळे संपुर्ण राज्य हदारूवून गेले होते. पिडीत युवती बांगालादेशची असल्याने मानवी तस्करीचे प्रकरण प्रकाशझोेतात आले होते. मानवी तस्करी प्रकरणामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.