Wed, Jun 26, 2019 23:59होमपेज › Nashik › ताई बामणेने फडकावला बँकॉकमध्ये तिरंगा

ताई बामणेने फडकावला बँकॉकमध्ये तिरंगा

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:55PMत्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी 

तालुक्यातील हरसूलजवळच्या दलपतपूर येथील ताई बामणे या युवा धावपटूने बँकांकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घालत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. ‘युवा ऑलिम्पिक अर्जेंटिना-2018’ साठी ती क्वांलिफाय झाली आहे. या स्पर्धेत ताईने 1500 मीटर हे अंतर 4 मिनिट 25 सेकंद आणि 66 मिमी सेकंदात पार केले.