Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Nashik › मोधळपाडा वनपरिक्षेत्रात आढळले आजारी तरस

मोधळपाडा वनपरिक्षेत्रात आढळले आजारी तरस

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:25PM

बुकमार्क करा
सुरगाणा : वार्ताहर

तालुकातील मोधळपाडा (बार्‍हे) वनपरिक्षेत्रात अंदाजे  सहा वर्षे  वयाचे तरस आजारी  स्थितीत आढळून आले आहे. ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला कळविली. वनपरिक्षेत्र अधिकारी  एस. आर. सोनवणे, वनपाल अमित  साळवे,  वनरक्षक  नरेश न्हावकर यांनी तातडीने  घटनास्थळ गाठले. आजारी तरसाला  बार्‍हे येथील पशुवैद्यकीय आरोग्य  केंद्रात दाखल करण्यात आले.  तेेथे उपचार  करून  त्यास सुरगाणा येेथे तालुका पशुवैद्यकीय  रुग्णालयात  दाखल केले.  

यानंतर  वन अधिकार्‍यांनी  पुढील  उपचारासाठी  जिल्हा पशुवैद्यकीय  रुग्णालयात  दाखल  करण्यात आले आहे. त्यास चाळीस  अंश सेल्सिअसपेक्षा जास्त  ताप असून, न्यूमोनिया  झाल्याचे पशुवैद्यकीय  अधिकार्‍यांनी सांगितले. आदिवासी  बोलीभाषेत तरसास रुवाट्या, पडगांड्या, टेंभुर्ण्या खड्या या नावाने ओळखले जाते. तरसाच्या दोन जाती या भागात आढळून  येत असून, एक तरस एकाच रंगात आढळतो तर दुसर्‍याच्या अंगावर पट्टे  आढळतात.