Mon, Nov 19, 2018 06:49होमपेज › Nashik › नाशिक : शिवसेनेकडून मनपा अतिरिक्त आयुक्तांना डस्टबीनची भेट (Video)

नाशिक : शिवसेनेकडून मनपा अतिरिक्त आयुक्तांना डस्टबीनची भेट (Video)

Published On: Dec 14 2017 4:21PM | Last Updated: Dec 14 2017 4:21PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

डस्टबीन घोटाळ्याची चौकशी करावी आणि संबंधितांना जाब विचारण्यासाठी शिवसेनेने महानगरपालिकेत आंदोलन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्‍त किशोर बोरडे आणि डॉ. सुनिल बुकाने यांना शिवसेनेने डस्टबीनच भेट म्हणून दिले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य विभागाने 21 लाख रुपयांचे 189 डस्टबिन खरेदी केले आहे. एका डस्टबिनची किंमत 11,121 रुपये इतकी आहे. बाजारात याच प्रकारच्या डस्टबिनची बाजारभावानुसार अडीच ते तीन हजार इतकी किंमत आहे. असे असताना 11 हजार रुपयांना केलेली खरेदी संशयास्पद असून, याबाबत संबंधित अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

मंगळवारी रोजी महापौर रंजना भानसी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा करत दखल घेतली होती.