Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Nashik › प्रा. के. रं. शिरवाडकर  यांचे पुण्यात निधन

प्रा. के. रं. शिरवाडकर  यांचे पुण्यात निधन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचे धाकटे बंधू, ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर (92) यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या दोन मुली परदेशात वास्तव्यास असल्याने प्रा. शिरवाडकर यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.28) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

पुण्याच्या कोथरुड येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून प्रा. शिरवाडकर यांची प्रकृती बरी नव्हती. त्यातच रविवारी रात्री त्यांना झोपेत हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी मीना, चार कन्या - शोभा, स्वाती, शैला व रेखा, जावई असा परिवार आहे. पैकी शैला व रेखा या परदेशात वास्तव्यास असून, त्या भारतात पोहोचल्यानंतर बुधवारी (दि.28) प्रा. शिरवाडकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.    

Tags : 


  •