होमपेज › Nashik › आरोग्य विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर राष्ट्रवादीचा झेंडा

आरोग्य विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर राष्ट्रवादीचा झेंडा

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:54PMपंचवटी : वार्ताहर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट व स्टुडंट कौन्सिलच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व निमा स्टुडंट फोरम यांच्यासोबत झालेल्या निवडणुकीत सिनेटपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहे. मयूर सोनवणे, प्रतीक इंगळे, अभिषेक शिरसाठ यांची निवड झाली. स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदी सागर बेनकी, उपाध्यक्षपदी गौरी राणे व आशितोष बागडे तर सचिवपदी आकाश जयसिंगपुरे, सहसचिवपदी आकांक्षा कातकाडे व पूजा घोडके यांची निवड झाली.

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी राविकाँचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील व आमदार जयवंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार, युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राहुल शेलार, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, संजय खैरनार आदींच्या उपस्थितीमध्ये विद्यापीठामध्येच स्वागत केले. निवडणूक यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, आकाश कदम, श्रेयांश सराफ व धीरज मगर या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

शिवसेना-राष्टृाबादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी एका मतदाराला मतदानास घेऊन चालले असता, वेळ संपल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसोबत बाचाबाची झाली. यानंतर काहीकाळ विद्यापीठात तणाव होता. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, याबाबत कोणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने या सर्व प्रकारावर पडदा पडला.