Tue, Jun 25, 2019 13:57होमपेज › Nashik › हिरे परिवाराला सेनेचे निमंत्रण

हिरे परिवाराला सेनेचे निमंत्रण

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 15 2018 1:24AMसिडको : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी तयारी सुरू असतानाच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. यावेळी हिरे कुटुंबीयांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला. तर खा. राऊत यांनीदेखील याबाबत प्रस्ताव दिला आहे.

निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. भाजपाचे माजी शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी भाजपाला जय श्रीराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली, मात्र, त्यांनी प्रवेशासाठी दोन दोन तारखा दिल्या. त्यातच मराठा आरक्षणाच्या वातावरणामुळे त्यांचा प्रवेश लांबला होता. तर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत व संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी हे नाशकात आले असता हिरे यांनी खा. राऊत यांना चहापाण्यासाठी निमंत्रण दिले होते.

त्यामुळे त्यांनी हिरे यांच्या निवासस्थानी जाऊन माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, डॉ.अद्वय हिरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हिरे कुटुंबीयांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला. यावेळी हिरे कुटुंबीयांनीसुद्धा लोकसभा व विधानसभेसाठी उमेदवारी मिळविण्याचा प्रस्ताव दिला. तर तुमच्या प्रस्तावावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चा करून निर्णय कळविण्यात येईल, असे खा. राऊत यांनी हिरे यांना सांगितल्याची माहिती आहे. यावेळी हिरे यांनी नाशिक लोकसभा व मालेगाव बाह्य मतदारसंघाची मागणी केल्याची चर्चा आहे. या भेटीमुळे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.