Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Nashik › कापूस खरेदीत मापात पाप!

कापूस खरेदीत मापात पाप!

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:53PM

बुकमार्क करा
नांदगाव : प्रतिनिधी

कापसावरील बोंडअळीने शेतकरी आधीच त्रस्त झालेला असताना कापूस खरेदी करणार्‍या काही व्यापार्‍यांकडून क्‍विंटलमागे 15 किलो कापसाची चोरी होत असल्याचे समोर आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ढेकू येथील शेतकर्‍यांनी दोन व्यापार्‍यांना मारुती मंदिरात डांबले.

कापसाला आधी जेमतेम 4500 रुपये भाव. त्यात क्‍विंटलमागे 15 किलोची चोरी, यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. दुसरीकडील काट्यावर वजन केलेला कापूस व त्यांच्या साध्या काट्यावर वजन केलेला कापूस यांच्यात क्‍विंटलमागे 15 किलोची तफावत दिसून आली. याची भरपाई मिळावी म्हणून काही शेतकर्‍यांनी संबंधित लबाड व्यापार्‍यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते जुमानत नसल्याने ढेकू खु॥ येथील शेतकर्‍यांनी त्या दोघांना डांबले. पोलीस पाटील विजय चव्हाण, रमेश राठोड, साईनाथ राठोड, राजेंद्र राठोड यांनी बोलणी केली. वजनातील फरकाचे पैसे शेतकर्‍यांना परत देण्याच्या बोलीवर सोडले. यावेळी नांदगाव पोलीस उपस्थित होते.