Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Nashik › गोळीबार करणार्‍या संशयिताची धिंड

गोळीबार करणार्‍या संशयिताची धिंड

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:52PM

बुकमार्क करा
सातपूर :  वार्ता

एकाला जिवे मारण्याचा व हवेत गोळीबार करून दहशत पसरवणार्‍या परप्रांतीय युवकाची सातपूर पोलिसांनी श्रमिकनगर परिरातून शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी  धिंड काढली. नंदन कवलधारी जयस्वाल (वय 23, मुळ अजमगड, उत्तर प्रदेश, ह. रा. श्रमिकनगर) असे युवकाचे नाव आहे. मागील आठवड्यात सातपूरमधील श्रमिकनगर, सातमाऊली परिसरात गावठी पिस्तूलच्या साह्याने एकास जिवे मारण्याचा प्रयत्न करत हवेत गोळीबार करून नंदनने दहशत पसरवणारा प्रयत्न केला होता. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, संदीप वर्‍हाडे, डी. के. पावर, सागर कुलकर्णी, पो. ह. देशुमख यांनी ही कारवाई केली.