Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Nashik › तहसील कार्यालयाला ठोकले टाळे

तहसील कार्यालयाला ठोकले टाळे

Published On: Apr 11 2018 12:58AM | Last Updated: Apr 11 2018 12:18AMसटाणा : वार्ताहर

कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी (दि.9) आक्रमक पवित्रा घेत येथील तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांमुळे यात यश आले नसले तरी मनसैनिकांनी दालनाबाहेर ठिय्या देऊन जोरदार घोषणाबाजी केली. अखेर प्रांताधिकार्‍यांनी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नसल्याने नागरिकांची अनेक शासकीय कामे खोळंबली आहेत. आमदार आणि तहसीलदार यांच्यातील संघर्षामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत तालुक्यासाठी पूर्णवेळ तहसीलदारांची नेमणूक करावी, अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली होती.

मागणीकडे दुर्लक्ष केल्यास थेट तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला होता. त्याप्रमाणे अखेर आपल्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मनसेने मंगळवारी (दि.10) तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला.   यावेळी तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनासमोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. प्रांत अधिकारी प्रवीण महाजन यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या.  लवकरच कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, हर्षवर्धन सोनवणे, मंगेश भामरे, अरुण पवार, दिनेश जाधव, ललित नंदाळे, दादा इंगळे, अनिल सोळंकी, तुषार भामरे, गणेश सोनवणे, योगेश साळुंके, राहुल सोळंके, मनोहर हिरे, ललित गांगुर्डे, भाऊसाहेब ठाकरे, सागर सोळंके, रवींद्र देसले, संदीप शिरसाठ, मुकेश बाविस्कर,  रेखाबाई पवार, सुशीला कापडणीस, इंदुबाई गायकवाड, तोल्याबाई सोनवणे, बायजाबाई देवरे, ताईबाई पवार, बायजाबाई पवार, भिकूबाई पिंपळसे, शानुबाई गायकवाड, अंजना ठाकरे आदी सहभागी झाले होते.
 

 

 

tags  : Satana,news,permanent, tahasildars, appointment, Appointment, demand,