होमपेज › Nashik › गर्भपातास नकार दिल्याने विवाहितेला पेटविले

गर्भपातास नकार दिल्याने विवाहितेला पेटविले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सटाणा : वार्ताहर

गर्भपात करण्यास नकार दिल्याने विवाहितेवर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी (दि.25) सकाळी उघडकीस आली आहे. शहरातील पिंपळेश्‍वरमधील अंबिकानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या रुपाली विलास कुमावत (23) ही या घटनेत गंभीर भाजली असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती, दीर व सासरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रुपाली ही पाच महिन्याची गर्भवती आहे.

तिने गर्भपात करावा, यासाठी पती विलास, दीर योगेश व सासरे दशरथ गंगाधर कुमावत हे वारंवार शारीरिक, मानसिक छळ करीत होते. शनिवारी (दि.24 )रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास याच कारणावरून तिला लाकडी दंडुक्याने मारहाण करण्यात आली. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात रूपाली 55 टक्के भाजली असून, तिनेच या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असली तरी सायंकाळपर्यंत कुणालाही अटक झालेली नव्हती.
 

 

 

tags : Satana,news ,Rupali, Vilas, Kumavat ,Abortion,


  •