Tue, Jul 16, 2019 22:27होमपेज › Nashik › संजय गांधी योजनेचे अनुदान आता थेट बँक खात्यात

संजय गांधी योजनेचे अनुदान आता थेट बँक खात्यात

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 21 2018 11:00PMनाशिक : प्रतिनिधी

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे मासिक अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार्‍या या उपक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील ूुसहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम यशस्वी ठरल्यास तो देशभर राबविण्यात येणार आहे.

समाजातील  निराधार, वृद्ध, दिव्यांग तसेच मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती तसेच विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला आणि घटस्फोटीत महिलांना जीवनात आधार म्हणून संयज गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये लाभार्थ्याला महिन्याकाठी 600 रूपये मानधन दिले जाते. तसेच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास 900 रूपये मानधन दिले. लाभार्थ्यांना दिल्या जाणार्‍या 600 रूपयांच्या मानधनात 200 रूपयांचा हिस्सा हा केंद्र सरकार उचलत असते. तर उर्वरित पैसे हे राज्य सरकार देते. दरम्यान, केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे अनुदान हे आता थेट बँक खात्यांत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्ह्यात 64 हजार 853 लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील सहा तालूक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर देवळा, चांदवड, बागलाण, नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्‍वर आणि येवला तालुक्यामधील लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर 200 रुपये मानधन दिले जाणार आहे. या सहा तालुक्यातील 13 हजार 806 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

तीन महिन्यांचे मानधन रखडले

केंद्र सरकारकडून मानधनाची रक्कम वर्ग केल्यानंतर राज्य सरकार त्यात स्वत:चा हिस्सा टाकत सदरची रक्कम जिल्हा प्रशासनांकडे वर्ग करत असते. साधारणत: तीन महिन्यांची रक्कम एकदम जिल्हा प्रशासनांना दिली जाते. मात्र, गत मार्च महिन्यात सरकारने निधीच दिला नव्हता. परिणामी तीन महिन्यांचे मानधन रखडले होेते. हे मानधन मिळावे म्हणून लाभार्थी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत होते. दरम्यान, थेट बँक खात्यात मानधन वर्ग करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास लाभार्थ्यांच्या सर्व चिंता मिटणार आहे.