Mon, Apr 22, 2019 06:07होमपेज › Nashik › समीर भुजबळ यांचा कोठडीतील मुक्‍काम वाढला

समीर भुजबळ यांचा कोठडीतील मुक्‍काम वाढला

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:44PMनाशिक : प्रतिनिधी 

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या जामिनावरील सुनावणी न्यायालयाने येत्या 5 जूनपर्यंत तहकूब ठेवली आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर केला.

त्यामुळे समीर भुजबळ यांनाही जामीन मिळेल, अशी भुजबळ समर्थकांना आशा होती. त्यामुळे समीर यांनीदेखील जामीन मिळावा यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यावर गुरुवारी (दि.24) सुनावणी झाली. न्यायालयाने या बाबतचा निर्णय तहकूब ठेवला असून, त्यावर 5 जूनला सुनावणी केली जाणार आहे.